सोने - चांदीचा भाव

Gold-Silver Rate : जळगावमध्ये सोन्याचे दर थेट ६ हजारांनी कोसळले! चांदी १० हजारांनी स्वस्त; पाहा आजचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२६ । सोने आणि चांदीच्या दरात सुरू असलेली घसरण अद्यापही कायम असून, आज शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच जळगावच्या सराफ बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी घट झाली. विशेष म्हणजे, सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम तब्बल ६ हजार रुपयांची तर चांदी दरात प्रति किलो १० हजार रुपयांची घसरण झाली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू होत असतानाच दर कमी झाल्याने दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Gold Silver Rate Today

दिवाळीपासून सोने आणि चांदी दरात घसरण सुरु आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जळगावच्या सराफ बाजारात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख ३० हजार ७० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४२ हजार रुपये होता. त्याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलो १ लाख ८८ हजार रुपये नोंदविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असून लक्ष्मीपूजनापासून आजपर्यंत सोनं १८ हजारांनी, चांदी ३३ हजारांनी स्वस्त झाली.

आजचे सोन्याचे दर

जळगाव सराफ बाजारातील आजच्या दरानुसार, २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख १४ हजार ४० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २४ हजार ५०० रुपयांवर आला आहे. कालच्या तुलनेत दोन्ही प्रकारच्या सोन्यात ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांची घट झाली आहे.

चांदीचे दर

दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. काल १ लाख ६५ हजार रुपये किलो असलेली चांदी आज १ लाख ५५ हजार रुपयांवर आली आहे. म्हणजेच चांदीच्या दरात किलोमागे १० हजार रुपयांची घट झाली आहे. खरेदीपूर्वी सराफ व्यावसायिकांकडून अंतिम दर आणि जीएसटीसह लागू होणारी किंमत तपासून घ्यावी.

लक्ष्मीपूजनापासून आतापर्यंत सोन्या-चांदीच्या दरात झालेली घसरण पाहता लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरातील घसरण पुढेही कायम राहते का, याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button