जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । जळगाव शहर महानगर पालिकेमध्ये नागरिकांच्या सेवेसाठी असणाऱ्या लिफ्टमध्ये लिफ्ट मॅन नासल्याने नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी या सर्व लिफ्ट मध्ये लिफ्ट में बसवण्यात यावे असे आदेश महापौर जयश्री महाजन यांनी दिले आहेत.
महानगरपालिकेतील लिफ्ट मध्ये लिफ्ट मॅन नसल्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशा वेळेस नागरिकांचे हाल टाळण्यासाठी प्रत्येका लिफ्टमध्ये लिफ्टमन असला पाहिजे या दृष्टीने महापौरांनी आदेश दिले आहेत. पुढच्या आठवड्यात जळगाव महानगरपालिकेच्या मुख्य इमारती मध्ये प्रत्येकाला लिफ्ट मध्ये एक लिफ्ट मॅन असणार आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन यांनी हे खास आदेश दिले आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे. जळगाव महानगरपालिकेमध्ये एकूण ७ लिफ्ट आहेत. या लिफ्टमध्ये लिफ्टमन नसल्याने नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. मात्र, आता लिफ्ट मॅन मुळे नागरिकांची हाल कमी होणार आहेत.