जळगाव लाईव्ह इम्फेक्ट ! मुक्ताईनगरातील ‘त्या’ पुलाची अखेर डागडुजी!

जळगाव लाईव्ह न्युज|सुभाष धाडे| मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर ते जुने घोडसगाव रस्त्यावर वर्षभरापूर्वी बांधण्यात आलेल्या एका छोट्या पुलाच्या स्लॅब उकरुन स्लॅबमधील लोखंडी सळई चक्क बाहेर आल्या असल्याचे वृत्त ‘जळगाव लाईव्ह न्युज’ ने प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशीत करताच संबंधित विभागाला जाग आली.आज सकाळीच सदर पुलावरील उकरलेला स्लॅब व बाहेर आलेल्या लोखंडी सळई यांची व्यवस्थितपणे दागडुजी करण्यात आल्याचे पहावयास मिळाले.


गत वर्षभरापूर्वी झालेल्या या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असुन वर्षभराच्या आतच पुलावरील दोन्ही बाजुंचे काॅक्रेट उकरले गेलेले होते. तसेच एका बाजूने स्लॅबमधील लोखंडी सळई बाहेर आलेली होती.गत पंधरवाडा उलटला तरी या दागडुजीचे काम करण्यास संबंधितांकडुन दिरंगाई होत होती. काल २६ एप्रिल रोजी याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधितांना जाग आली व दुरस्तीचे काम करण्यात आले. दरम्यान दुरुस्ती केल्यानंतर कामाच्या आजु-बाजुला दगड ठेवलेले आहे.