महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

जुलै 27, 2026 5:10 PM

मुंबईतील बालहृदयरोग तज्ज्ञांच्या सहकार्याने कॅथलॅबमध्ये चिरफाडविरहित उपचार,बालकांना मिळाले नवजिवन

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव येथील महादेव हॉस्पिटलमध्ये दोन बालकांच्या जन्मजात हृदयाला असलेले छिद्र (जन्मजात हदयदोष — एएसडीॄ/पीडीए/व्हीएसडी प्रकारातील योग्य रुग्णासाठी) अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर पद्धतीने यशस्वीरित्या बंद करण्यात आले. डॉ. वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील पेडीयाट्रीक कॉर्डीओलॉजीस्ट तज्ज्ञांच्या सहकार्याने चिरफाडविरहित यशस्वी उपचार करण्यात आले.

MH

ही शस्त्रक्रिया महादेव हॉस्पीटलच्या अत्याधुनिक कॅथलॅबमध्ये पार पडली असून रुग्णावर कोणतीही मोठी चिरफाड न करता, रक्तवाहिनीद्वारे विशेष डिव्हाइस बसवून हृदयातील छिद्र बंद करण्यात आले.यावेळी महादेव हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील (ॄडीएम कॉर्डीओलॉजी) यांच्या नेतृत्वाखाली अपोलो हॉस्पिटल, मुंबई येथील पेडीयाट्रीक कॉर्डीओलॉजीस्ट डॉ. भूषण चौहान, डॉ. धवल खडके तसेच डॉ. झीशान सय्यद (कॉर्डीओलॉजी निवासी वैद्यकिय अधिकारी) यांनी महत्त्वपूर्ण कामगीरी आव्हान स्विकारत पुर्ण केली.या प्रक्रियेत कॅथलॅब टेक्निशियन मोहम्मद सिद्दिकी यांनीही तांत्रिक जबाबदारी उत्कृष्टरीत्या पार पाडत सहाकार्य केले.

याबाबत बोलतांना डॉ. वैभव पाटील यांनी सांगितले की, जन्मजात हृदयातील छिद्राची वेळेत तपासणी व उपचार केल्यास मुलांचे आयुष्य पूर्णपणे निरोगी राहू शकते. आधुनिक डीव्हाईस क्लोजर तंत्रज्ञानामुळे छाती उघडण्याची गरज भासत नाही, रक्तस्राव कमी होतो, रुग्ण लवकर बरा होतो आणि अल्पावधीत घरी परतू शकतो. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे जळगाव व उत्तर महाराष्ट्रातील बालहृदयरुग्णांना आता अशा अत्याधुनिक उपचारांसाठी मुंबईसारख्या महानगरात जाण्याची आवश्यकता कमी होणार असून, महादेव हॉस्पिटलमध्येच उच्च दर्जाची पेडीयाट्रीक कॉर्डीओलॉजी सेवा उपलब्ध असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now