Gold Rate : मार्चच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोने वधारले ; जळगावच्या सुवर्णपेठेत असे आहेत भाव?

मार्च 4, 2025 10:30 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२५ । गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये सोन्याच्या किमतीने नवनवीन उच्चांक गाठल्याचे दिसून आले. यानंतर आता मार्च महिन्यात सोन्याचे दर घसरणार की वाढणार? याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे. मात्र मार्चच्या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याने आपला रंग दाकवलेला दिसत आहे.

gold silver jpg webp

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा दर प्रति तोळा ३०० रुपयांनी वाढलेला दिसून आला. यामुळे आज जळगावच्या सराफ बाजारात सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ८५,७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. दुसरीकडे चांदीचा दर स्थिर दिसून आला आहे. सध्या एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ९६००० रुपये इतका आहे.

एकीकडे भारतीय शेअर बाजारात घसरणीचं सत्र सुरु असताना सोन्याच्या दरात तेजी सुरु आहे. जानेवारी महिन्यापासून सोन्यात दरवाढीचे सत्र सुरू आहे. 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर झाल्यापासून सोन्याने मोठा पल्ला गाठला. चांदीत या काळात चढउताराचे सत्र दिसून आले.

जळगावच्या सराफ बाजारात गेल्या आठवड्यात सोने दरात मोठी घसरण दिसून आलीय. या दरम्यान सोने दरात १५०० रुपयाची घसरण दिसून आलीय. तर चांदी दरात २००० रुपयांची घसरण झालेली दिसून आली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment