बाबो..! सोन्याने आतापर्यंतचा उच्चांकी दर गाठला, जळगावात प्रती तोळ्याचा दर ६८ हजारांवर

मार्च 30, 2024 9:52 AM

जळगाव लाईव्ह न्युज : ३० मार्च २०२४ : जागतिक घडामोडीमुळे सोने चांदीच्या दरात सुरू असलेली वाढ थांबत नसून ग्राहकांना दिलासा मिळण्याची चिन्ह दिसत नाही. ऐन लग्नसराईत सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. अशात जर तुम्ही सोने चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला झटका देणारी बातमी आहे. ती म्हणजे काल शुक्रवारी एकाच दिवसात सोन्याच्या भावात एक हजार रुपयांन वाढ झाली. तर चांदी ५०० रुपयांनी वाढली.

gold jpg webp

यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याचा दराने विनाजीएसटी ६८ हजार रुपयाचा टप्पा ओलांडला आहे. तर जीएसटीसह सोन्याचा दर ७० हजार रुपयांवर गेला आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात २१ मार्चला सोन्याच्या दराने विनाजीएसटी ६७ हजाराचा सर्वकालीन उच्चांकी दर गाठला होता. मात्र आज सोन्याच्या दराने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहे. दरम्यान, वाढत्या दरामुळं सोन (gold) खरेदी करावं की नको असा प्रश्न खरेदीदारांच्या मनात येत आहे.

आजचा भाव:
जळगावच्या सुवर्णनगरीत काल १००० रुपयाची वाढ झाल्यानंतर २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ६८ हजार ६०० रुपये प्रति तोळावर पोहोचला आहे. तर एक तोळा सोन्यासाठी ३ टक्के जीएसटीसह आता ७०,६५८ रुपये मोजावे लागणार आहे. दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर ७५,५०० रुपयावर पोहचला आहे.

दर वाढण्याचे कारणं काय?
सोन्याच्या दरातील वाढ सध्या कायम असल्याचं चित्र दिसत आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याला मजबूत मागणी आहे. या मागणीचा परिणाम दरांवर होत आहे. तसेच अमेरिकेत व्याजदरात कपात झाल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिवाळीपर्यंत ७५ हजार भाव?
सोन्याचे वाढते भाव पाहता, ते दिवाळीपर्यंत ७० हजारांपर्यंत पोहचतील, असा अंदाज होता. मात्र सध्याची स्थिती पाहता सोने ७५ हजारांपर्यंत पोहचेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now