भीषण दुर्घटना! कंटेनरच्या धडकेत भुसावळच्या दोघांचा जागीच मृत्यू; अर्धा किमी फरफटत नेले

सप्टेंबर 23, 2026 11:09 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । वरणगावकडून भुसावळकडे येणाऱ्या दुचाकीला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दीपनगर महामार्गावरील ओव्हरब्रिजजवळ घडली असून मिर्झा सलीम बेग (वय ६१, मूळ रा. आग्रा, हल्ली मुक्काम भुसावळ) आणि देवेंद्र चौधरी (वय ३६, रा. भुसावळ) असं अपघतातील मृतांची नाव आहेत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

dpac

मिळालेल्या माहितीनुसार, मिर्झा सलीम बेग व देवेंद्र चौधरी हे दोघे वरणगावकडून मोपेड दुचाकीने भुसावळच्या दिशेने निघाले होते. त्याच वेळी मागून सुसाट वेगाने येणाऱ्या एका कंटेनरने (यु.पी. ३२ एक्स.एन. ४४५७) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही दुचाकीस्वार मोपेडसह कंटेनरच्या पुढील चाकाखाली अडकले. भयानक बाब म्हणजे, एवढे सगळे घडूनही चालकाने वाहन थांबवण्याचे सौजन्य दाखवले नाही; उलट कंटेनर सुसाट वेगाने पुढे दामटत तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत मृतदेह व दुचाकी फरफटत नेण्यात आली. अखेर काही अंतरावर ते रस्त्याच्या बाजूला फेकले गेले.

हा अंगावर काटा आणणारा अपघात पाहून मार्गावरील नागरिकांनी तात्काळ भुसावळ बाजारपेठ व तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी चालकाचा पाठलाग केला.

दुसरीकडे, नशिराबाद पोलिसांनी टोलनाका परिसरात सतर्क राहत नाकाबंदी केली आणि आरोपी कंटेनर चालक अर्पित सिंग (वय २६, रा. रायबरेली) यास बेड्या ठोकल्या. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. या दुर्दैवी घटनेने भुसावळ शहरावर शोककळा पसरली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now