सोने - चांदीचा भाव

जळगाव सराफ बाजारात सोन्याचे दर घसरले; चांदीचे भाव स्थिर, जाणून घ्या आजचे दर

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात आज किरकोळ घसरण नोंदवण्यात आली आहे. २२ आणि २४ कॅरेट सोन्याच्या भावात घट झाली असून, चांदीचे दर मात्र स्थिर आहेत. लग्नसराईच्या काळात सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचे दर महत्त्वाचे ठरणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव सराफ बाजारात काल २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख १५ हजार ८७५ रुपये होता. आज शनिवारी सकाळी तो १ लाख १५ हजार ६९० रुपयांवर आला आहे. म्हणजेच २२ कॅरेट सोन्यात १८५ रुपयांची घसरण झाली आहे.

तर २४ कॅरेट सोन्याचा दर काल १ लाख २६ हजार ५०० रुपये होता. आज तो १ लाख २६ हजार ३०० रुपयांवर आला असून, त्यात २०० रुपयांची घट झाली आहे. दुसरीकडे, चांदीचा दर काल आणि आजही १ लाख ५८ हजार रुपये प्रति किलो इतकाच कायम आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button