
जळगाव लाईव्ह न्यूज । गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरू असल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता; मात्र, आज २७ नोव्हेंबर रोजी जळगाव सराफा बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळा १ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात किलोमागे ४ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
काय आहेत सोने चांदीचा भाव?
जळगाव सराफा बाजारात आज सोन्याचा दर १ लाख २५ हजार ५०० रुपये, तर चांदीचा दर १ लाख ५६ हजार रुपये नोंदवण्यात आला. सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर अचानक झालेल्या या दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. दोन दिवसांपूर्वी दरात घसरण झाल्याने ग्राहकांना खरेदीची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आज बाजार सुरू होताच सोन्याने १ हजार रुपयांची, तर चांदीने ४ हजार रुपयांची वाढ नोंदवली.
या दरवाढीचा परिणाम लग्नसराईच्या काळात दागिने खरेदी करण्याच्या तयारीत असलेल्या ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ग्राहकांचे लक्ष आगामी दिवसांतील दरांच्या हालचालींकडे लागले आहे.
सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत असल्याने ग्राहकांना खरेदीचा निर्णय घेणे कठीण झाले आहे. विशेषतः लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणारे ग्राहक दर कमी होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरची स्थिती आणि रुपयाच्या मूल्यातील चढ-उतार यांचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत असतो. त्यामुळे आगामी काळात दर पुन्हा घसरणार की तेजी कायम राहणार, याकडे ग्राहक आणि सराफा व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.





