⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

महाराष्ट्र हादरला : पोटच्या मुलीने घेतला आईचा जीव अन् केले शरीराचे तुकडे तुकडे

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२३ । पोटच्या मुलीनेच आईची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केल्याची धक्कादायक घटना मुंबई येथील लालबाग परिसरात घडली आहे.

वीणा जैन (वय ५५) असे मृत महिलेचे नाव असून, पोलिसांनी तिच्या हत्येप्रकरणी मुलगी रिंपल जैन (वय २४) हिला अटक केली आहे. रिंपलने आईच्या मृतदेहाचे पाच तुकडे करून घरातील कपाटात प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवले होते. सुमारे तीन महिने ती आईच्या मृतदेहासोबत राहिल्याचा अंदाज आहे. या हत्याकांडामुळे लालबागमध्ये खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी कि, रिम्पल जैन हिचे वडील काही वर्षांपूर्वी आजाराने वारले होते. यामुळे तिच्या आईची आणि तिची देखभाल तिचा मामा करत होता. लालबाग परिसरात मामाने पेरू कंपाऊडमधील घर वीणा आणि रिंपल यांना राहण्यासाठी दिले होते. गेल्या एकही महिन्यांपासून मुलगी रिम्पल आपल्या आईचा संपर्क होऊ देत नव्हती. यामुळे मामाला आणि त्याच्या घरच्यांना संशय आला होता. मंगळवारी रिंपलची मामेबहीण पैसे देण्यासाठी घरी आला असता, रिंपलने दरवाजा किलकिला करून पैसे घेतले आणि पुन्हा बंद करून घेतला. त्या वेळी आजूबाजूच्यांनी वीणा बरेच दिवस दिसली नसल्याचे सांगितले.

काळाचौकी पोलिसांचे पथक रिंपलच्या घरात झाडाझडती घेत असताना, प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, प्लास्टिकच्या पिशवीत वीणा यांचे धड आणि स्टीलच्या टाकीमध्ये हात व पाय कुजलेल्या स्थितीत सापडले. पोलिसांनी हे सर्व अवयव हस्तगत करून वैद्यकीय विश्लेषणासाठी रुग्णालयात पाठविले. रिंपलकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक केली.