गोमांस आढळल्यानंतर मनपाने अनधिकृत गोडाऊन केले भुईसपाट

ऑगस्ट 22, 2026 3:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने धडक कारवाई केली. महापौर दीपमाला काळे यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी संबंधित अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त केले.

gs 1

शहरात उघड्यावर मांस विक्री तसेच नियमबाह्य पद्धतीने मांस विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापौर दीपमाला काळे यांनी प्रशासनाला यापूर्वीच दिले होते. त्यानुसार सुप्रीम कॉलनी परिसरात संशयास्पद गोमांस आढळल्यानंतर महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाईचे पाऊल उचलले.

गोडाऊनवर मनपाचा हातोडा

शुक्रवारी सकाळपासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने संबंधित ठिकाणी कारवाई सुरू केली. गोमांस साठवणूक आणि विक्रीसाठी वापरले जात असल्याचा आरोप असलेले अनधिकृत गोडाऊन पाडण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.

अवैध मांस विक्रेत्यांना इशारा

महापालिकेच्या या कारवाईनंतर शहरातील बेकायदेशीर मांस विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नियमांचे उल्लंघन करून मांस विक्री, साठवणूक किंवा अन्य अनधिकृत प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.दरम्यान, शहरातील अशा प्रकारच्या अनधिकृत मांस विक्री केंद्रांवर यापुढेही कारवाईची मोहीम सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now