रेल्वे रुळाजवळ शौचाला बसणे पडले महागात

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२३ । रेल्वे रुळाजवळ शौचाला बसणे वृद्ध व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने ६० वर्षीय व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना घडकीस आली आहे. मंगळवार सकाळी आठच्या सुमारास पिंप्राळा पसिरात हि घटना उघडकीस आली. अशोक नंदलाल चव्हाण असे मृत वृद्धाचे नाव आहे.

अशोक हे धरणगाव तालुक्यात चव्हाण पत्नी, मुलगा व सुना यांच्यासोबत खंडेराव नगरात वास्तव्याला होते. मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास अशोक चव्हाण घरापासून जवळ असलेल्या रेल्वे रूळाजवळ शौचालयासाठी गेले. दरम्यान, धावत्या रेल्वेचा डोक्याला फटका बसल्याने त्यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. परिसरातील राहणारे तरुणांनी अशोक चव्हाण यांची ओळख पटवली. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस कॉन्स्टेबल रेवानंद साळुंखे, निलेश पाटील करत आहेत.