भारताचा तिरस्कार करणाऱ्या पाकिस्तानमध्ये महागाईचा भडका

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२३ । पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत खराब झाली आहे. ती इतकी कि, महागाई भारताहून तब्बल तिप्पट झाली आहे. पाकिस्तानातील नागरिक पीठ मिळावं म्हणून अक्षरशः हिंडत आहेत.

याचबरोबर महागाई इतकी वाढलीय की भारतात ५ रुपयांना मिळणारे पार्लेजी बिस्कीट पाकिस्तानात ५० रुपयांना विकले जात आहे. आपल्या देशात ४०-५० रुपयांना मिळणारे ब्रेडचे पाकिट पाकिस्तानमध्ये १५०-२०० रुपयांना विकले जात आहे.

त्यात अजून वाईट बाब म्हणजे, दहशतवादी देशात हाहाकार माजवत आहेत. देश आर्थिक पातळीवर कोलमडलेला असताना दहशतवाद्यांचे कारनामे काही केल्या थांबताना दिसत नाहीयेत.

जनता रस्त्यावर आली आहे. सरकारने आम्हाला मारून टाकलं तर बरं होईल अशी लोकांची भावना झाली आहे. लोक वाहनांच्यासमोर आडवे होऊन निषेध व्यक्त करत आहेत. दुकानाबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत.