पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का ; भारताकडून दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त, पाहा VIDEO

मे 10, 2025 10:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानात घुसून ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला. यांनतर पाकिस्तानकडून नापाक कारवाया सुरू झाल्या. पाकिस्तान वारंवार वारंवार गोळीबार, ड्रोन हल्ले, क्षेपणास्त्राने हल्ले करत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. त्याला भारतीय सैन्यांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताने पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. भारताने पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवाद्यांचे लाँच पॅड नष्ट केले. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

pad

संरक्षण सूत्रांचा हवाला देत एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, ‘लष्कराच्या या अचूक कारवाईत पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ड्रोन हल्ल्यांचे मूळ लक्ष्य करण्यात आले. लष्कराने पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड नष्ट केले. लष्कराने एक व्हिडिओ देखील जारी केला आहे ज्यामध्ये हे तळ उद्ध्वस्त होताना दिसत आहेत.


पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या हल्ल्याला भारताकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताच्या सैन्यांकडून हवेतच पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडले जात आहेत. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने भारतावर फतेह-२ क्षेपणास्त्र डागले होते. या क्षेपणास्त्राद्वारे पाकिस्तानचा राजधानी दिल्लीवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. पण पाकड्यांचे हे क्षेपणास्त्र सैन्यांनी पाडले. हरियाणातील सिरसा येथे हे क्षेपणास्त्र पाडण्यात आले. त्यामुळे मोठा धोका टळला.

पाकिस्तानकडून भारतातील सीमेलगतच्या अनेक शहरांवर सतत हल्ले केले जात आहेत. ज्याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले . जम्मू-श्रीनगर ते पठाणकोट आणि पोखरणपर्यंत पाकिस्तानचे ड्रोन हल्ले केले. शुक्रवारी रात्री पाकिस्तानने भारतावर २६ ठिकाणी ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय लष्कराने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले गेले. पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्यात जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थानमधील अनेक गावांचे मोठे नुकसान झाले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment