सर्वसामान्यांना महागाईचा झटक ! गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, वाचा नवीन दर

ऑक्टोबर 1, 2021 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२१ । आधीच वाढत्या महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले गेली असता त्यात आता पुन्हा एकदा महागाईचा मोठा झटका बसला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरचे दर वाढवले ​​आहेत. आज कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 43.5 रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता तुम्हाला रेस्टॉरंट्स आणि ढाबा इत्यादीमध्ये खाणे महाग पडू शकते.

gas

इंडियन ऑईल वेबसाइटने नवीन दर जाहीर 
इंडियन ऑईलने जारी केलेल्या नवीन दरांनुसार आता दिल्लीत 19 किलोचे व्यावसायिक सिलेंडर 1736.5 रुपये झाले आहे. यापूर्वी हे सिलेंडर 1693 रुपयांना उपलब्ध होते. मात्र, घरगुती वापरासाठी 14.2 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याच वेळी, आता कोलकातामध्ये 19 किलो व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1805.5 रुपये झाली आहे, जी आधी 1770.5 रुपये होती. पेट्रोलियम कंपन्या दर 15 दिवसांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीचा आढावा घेतात.

स्वयंपाकाच्या गॅसवर दिलासा
यापूर्वी 1 सप्टेंबरला एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत वाढवून 884.50 रुपये करण्यात आली. या महिन्यात घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

सीएनजीच्या किमतीतही वाढ होईल
हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी सरकारने नैसर्गिक वायूच्या किंमतीत 62 टक्के वाढ केली आहे. नैसर्गिक वायूचा वापर खते, वीजनिर्मिती आणि सीएनजी गॅस तयार करण्यासाठी केला जातो. या निर्णयानंतर सीएनजी, पीएनजी आणि खतांच्या किमतीही वाढण्याची शक्यता आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now