बापाकडून मुलीवर दीड वर्ष शारीरिक अत्याचार, अमळनेरातील खळबळजनक घटना

जुलै 21, 2023 3:24 PM

जळगाव लाईव्ह न्यूज। २१ जुलै २०२३ । माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांचे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. परंतु, आता तर रक्ताच्या नात्यातही असुरक्षितात निर्माण होताना दिसून येत आहे. अमळनेर शहरात बाप व मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शहरातील एका भागात राहणाऱ्या नराधमाने पोटच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या दीड वर्षांपासून अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नराधम बापाविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime jpg webp

अमळनेर शहरातील ही घटना आहे. अल्पवयीन मुलगी ही अमळनेर मध्ये वास्तव्यास आहे. आई व वडिलांचे भांडण झाल्यावर मुलीची आई बाहेरगावी निघून जात असे. त्यामुळे मुलगी आणि बाप दोघेच घरात राहत होते. रात्री जेवन करून झोपल्यानंतर नराधम बापाने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार सुरू केले. हा प्रकार तिने कुणालाही सांगितल नाही. कारण सांगितल्यास तुझ्या आईला आणि तुला ठार मारेल अशी धमकी नराधमाने दिली होती. त्यामुळे पिडीत मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार कुणाला सांगितला नाही.

गेल्या दीड वर्षांपासून हा प्रकार सुरूच होता. तिची ही पिडा कुणाला सांगावे हे देखील कळत नव्हते. १८ जुलै रोजी तिची आई आणि आजी घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितलं. त्यावेळी तिच्या आई व आजीला प्रचंड धक्का बसला. त्यांनी तातडीने मुलीला सोबत घेवून अमळनेर पोलीस ठाणे गाठले. पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now