हृदयद्रावक! मुलाला वाचवताना वडीलही बुडाले; अमळनेरात बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

ऑगस्ट 27, 2026 7:25 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर तालुक्यातील खवशी येथे तलावात बुडून १० वर्षीय मुलासह त्याच्या वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, खवशीसह परिसरात शोककळा पसरली आहे.

anna talware

काय आहे नेमकी घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, वीरेंद्र अण्णा तलवारे (वय १०) हा तलावात गेला असता अचानक पाण्यात बुडू लागला. मुलगा बुडत असल्याचे लक्षात येताच त्याचे वडील अण्णा एकनाथ तलवारे यांनी त्याला वाचविण्यासाठी तलावात धाव घेतली. मात्र, मुलाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात दोघेही पाण्यात बुडाले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने बाप-लेकाला पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यानंतर दोघांनाही तातडीने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले.

मुलाला वाचविण्यासाठी वडिलांनी घेतलेली धाव अखेर त्यांच्या जीवावर बेतली. बाप-लेकाच्या या दुर्दैवी मृत्यूची बातमी परिसरात पसरताच खवशी गावासह परिसरात शोककळा पसरली. तलवारे कुटुंबीयांच्या दुःखात ग्रामस्थांनी सहभागी होत हळहळ व्यक्त केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now