जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । युवासेना कॉलेज कक्ष तर्फे शनिवार 8 जुलै 2023 रोजी मूळजी जेठा महाविद्यालयाच्या गेटवर युवासेना कॉलेज कक्ष शाखेचे उद्घाटन करण्यात आले. शाखेचे उद्घाटन सकाळी 10.00 वा. युवासेना कार्यकारिणी सदस्य निलेश महाले व जळगाव शहराच्या महापौर जयश्री महाजन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना विस्तारक चैतन्य बनसोडे, युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख प्रितम शिंदे, जिल्हा युवाधिकारी पियुष गांधी, कॉलेज कक्ष जिल्हा युवाधिकारी हर्षल मुंडे, युवासेना महानगर युवाधिकारी अमोल मोरे, यश सपकाळे, उपजिल्हा युवाधिकारी विशाल वाणी, महेश ठाकूर, सोमसिंग पाटील, यश राठोड, अजय खैरनार, मोहित राठी, अक्षय काबरा, आकिब शेख आदि उपस्थित होते.
शाखा प्रमुख सुरज परदेशी, शाखा सरचिटणीस वैभाव मिस्तरी, उपशाखा प्रमुख ओम पाटील, शाखा सचिव तनिष्क दंडगव्हाळ, शाखा सदस्य राहूल लोंढे, अभय शेवाळे, श्रीकांत तायडे, यश तांबट, ललित पाटील, कृष्णल महाजन, दुर्गेश बकाल, अनिकेत ठाकूर, सुशांत येवले, मयूर कोळी, पृथ्वी ठाकूर, पार्थ सोनार, अंकित जांगीड, दर्शन कुमावत आदि उपस्थित होते.