⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

गोदावरी फाउंडेशनच्या सांस्कृतिक‎ कार्यक्रम उत्साहात

जळगाव‎ लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । गोदावरी फाउंडेशनच्या विविध ‎शैक्षणिक संस्थांतर्फे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात ‎विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे ‎सादरीकरण केले. फाउंडेशनचे‎ अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.‎ उल्हास पाटील यांच्या ‎ ‎वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम‎ घेण्यात आला.‎ गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.‎ उल्हास पाटील वैद्यकीय‎ महाविद्यालय, फिजिओथेरपी,‎ होमिओपॅथी, आयुर्वेद, गोदावरी‎ नर्सिंग महाविद्यालय यांच्या संयुक्‍त‎ विद्यमाने डॉ. केतकी पाटील‎ सभागृहात कार्यक्रम झाला.‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎ ‎

याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या‎ प्रेरणास्त्रोत गोदावरी पाटील, सचिव‎ डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी‎ पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.‎ वैभव पाटील, डॉ.अनिकेत पाटील,‎ डॉ. माणिक पाटील, डॉ. अलका‎ पाटील, स्नेही डॉ. सुहास बोरोले,‎ डॉ. सुरेखा बोरोले, डॉ. योगेश, डॉ.‎ अनुराधा व प्राध्यापक आदींची‎ ‎उपस्थिती होती. कार्यक्रमाची‎ सुरुवात स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ.‎ माया आर्विकर यांनी म्हटलेल्या‎ ‘मंगल दिन आज आयो, मंगल गान‎ सुनायो…’ या बंदिशीने झाली,‎ त्यांना डीन डॉ. एन. एस.आर्विकर‎ यांंनी पेटीवर साथ दिली. डॉ. किमया‎ पारखे, डॉ. प्रमोद साळुंके यांनी‎ सूत्रसंचालन केले.‎

गीत, कविता, नृत्यावर विद्यार्थ्यांनी केली धम्माल‎

तुझे प्यार करते है, करते रहेंगे…’ हे गीत आर्विकर दाम्पत्यानी सादर केले.‎ याप्रसंगी डॉ.अनुराग सादर करत असलेल्या ‘एक प्यार का नगमा है, मौजो‎ की रवानी है…’ या गीताला डॉ.उल्हास पाटील यांनी दाद दिली. डॉ.अमृत‎ महाजन यांनी हरिवंशराय बच्चन यांची ‘मुठ्ठी में कुछ सपने लेकर…’ या‎ कवितेचे सादरीकरण केले. प्रत्येक कॉलेजच्या ग्रुपने हिंदी, मराठी, पंजाबी‎ गीतावर नृत्याचे सादरीकरण केले.‎