⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

अखेर ग्रामस्थांच्या तक्रारीमुळे रस्त्याचे काम झाले उत्कृष्ट दर्जाचे

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । डोलारखेडा फाटा ते कुऱ्हा रोडवरील धामणगाव फाटा दरम्यान नव्याने डांबरीकरण रस्त्याचे काम सुरू असून महीनाभरापुर्वीच कामाच्या सुरुवातीला डोलारखेडा गावानजिक दिड-दोन किमीचे काम इंस्टेमेंट प्रमाणे न होता हलक्या प्रतीचे करण्यात आले होते. याबाबत ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा व तक्रारीमुळे अखेर रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे परीसरात हा चर्चेचा विषय बनला असून ग्रामस्थांचे कौतुकही ऐकायला मिळत आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा फाटा ते कुऱ्हा रोडवरील धामणगाव फाटा दरम्यान नव्याने डांबरीकरण रस्त्याचे काम सुरू असून महीनाभरापुर्वीच कामाच्या सुरुवातीला डोलारखेडा गावानजिक दिड-दोन किमीचे काम इंस्टेमेंट प्रमाणे न होता हलक्या प्रतीचे करण्यात आले होते. खाली वापरण्यात आलेला बीएमचा गेझ ५० एम एम पेक्षा कमी होता. हि बाब सर्वप्रथम डोलारखेडा ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी कामाठिकाणी वाद घालत, होत असलेल्या निकृष्ट कामाबाबत तक्रार केली होती. तसेच बामसेफ (लहुजी क्रांती मोर्चा )चे जिल्हाध्यक्ष राजेश ढगे यांनी कामाची स्वतः पाहणी केली होती. सदर कामात आक्षेपार्ह आढळल्याने ५मार्च रोजी ‘जळगांव लाईव्ह’ ने ‘मुक्ताईनगर तालुक्यातील रस्ते होताहेत निकृष्ट दर्जाचे’या मथळ्याखाली वास्तवदर्शक वृत्त प्रकाशित केले. दरम्यान बामसेफ जिल्हाध्यक्ष राजेश ढगे यांनी ‘काम वैधपध्दतीने न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.’ तसेच डोलारखेडा ग्रामस्थांनी कामाच्या निकृष्टविषयी तक्रार लावुन धरली. याबाबत माहीती कळल्यानंतर पं.स.सभापती विकास पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन सा.बा चे अधिकारी यांची कानउघाडणी करत खडे बोल सुनावले होते. अखेर संबंधित ठेकेदाराने दोन किमी रस्त्याचे कामात बीएमची जाडी वाढवत पुन्हा काम करुन रस्ता इंस्टेमेंट प्रमाणे बनविला असून रस्त्याच्या दोंन्ही बाजुंस चारी खोदुन साईडपट्ट्यांवर माती पसरवुन रोलर फिरवला. अगदी सर्व कामगिरी आटोपत ठेकेदाराकडुन डोलारखेडा गावाच्या नजदिकचे रस्त्याचे काम रितसर करण्यात आले.

ग्रामस्थांची जागरुकता कौतुकास्पद

डोलारखेडा ग्रामस्थांची जागरुकता कौतुकास्पद आहे. परीसरातुन सुरु असलेल्या कोणत्याही कामांच्या निकृष्टेबाबत तक्रारी असल्यास खपवुन घेतल्या जाणार नाही असे मत राजेश ढगे (जिल्हाध्यक्ष बामसेफ) यांनी व्यक्त केले.