जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव | तुषार देशमुख | आज दिनांक 30 रोजी दुपारी 4 वाजता चाळीसगावात येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बससेवा सुरू करण्यास तीव्र विरोध करण्यात आला.आज चाळीसगाव मधील एसटी डेपो मध्ये चार कर्मचारी हजर राहून दोन बस सेवा सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र याची बातमी मनसेला कळताच मनसेचे पदाधिकारी ताबडतोब बसस्थानक कडे रवाना झाले. आणि त्यांनी रस्त्यामध्ये बस अडवून या सुरू होणाऱ्या बस सेवेला आक्रमक पवित्रा घेत तीव्र विरोध केला.आणि बसमधील चालक वाहक यांना संपामध्ये पुन्हा सामील होण्याचे जाहीर आवाहन केले. चालक,वाहक यांना मनसेतर्फे सर्वतोपरी समज देऊन त्यांना श्रीफळ देऊन पुन्हा संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये सामील व्हावे अशी विनंती करण्यात आली.
याप्रसंगी मनसेचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष संग्रामसिंह शिंदे, शहराध्यक्ष अण्णा विसपुते, मनसे पदाधिकारी पंकज स्वार, दीपक पवार, वाल्मीक पाटील, पिंटू देसले, बबलू महाजन, भैय्या चौधरी, तुषार देशमुख आणि इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा :
- जळगाव शहरातून पुन्हा राजूमामा भोळे आमदार होणार? पाहा EXIT POLL
- जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान
- निवडणूक ड्युटीवरून घरी परताना शिक्षकावर काळाचा घाला; अपघातात दुर्देवी मृत्यू
- जळगाव जिल्ह्यात सूक्ष्म नियोजनामुळे मतदान सुरळीत; मतदान यंत्रात नगण्य त्रुटी
- जळगाव जिल्ह्यात संध्याकाळच्या 5 पर्यंत 54.69 टक्के मतदान; अनेक ठिकाणी शेवटच्या तासात मतदारांच्या केंद्रावरती रांगा