जळगाव जिल्ह्यात संध्याकाळच्या 5 पर्यंत 54.69 टक्के मतदान; अनेक ठिकाणी शेवटच्या तासात मतदारांच्या केंद्रावरती रांगा

नोव्हेंबर 20, 2024 5:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघात सकाळी ७ ते सायंकाळच्या ५ वाजेपर्यंत फक्त ५४.६९ टक्के मतदान झाले.

vote 1

जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये मतदारांचा प्रतिसाद संमिश्र दिसून आला असून, काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात मतदान झाले, तर काही ठिकाणी मतदान कमी प्रमाणात झालेले दिसले. आता शेवटच्या तासात मतदारांच्या केंद्रावरती रांगा लागलेल्या दिसून येत आहे. जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात मतदान करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आलीय.

गेंदालाल मिल परिसरातील महापालिकेच्या शाळेत मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर अवघी काही मिनिंट शेष असताना नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. या मतदान केंद्रातील प्रत्येक बूथसमोर चक्क नागरिकांच्या तीन-तीन रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील सुमारे ३६ लाख ५५ हजार ३४८ मतदार आज बुधवारी मतदानाचा हक्क बजावून १३९ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहेत. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी (अंदाजे) खालीलप्रमाणे:-

१५ अमळनेर -55.10%
१२ भुसावळ -52.44%
१७ चाळीसगाव -56.05%
१० चोपडा -52.13%
१६ एरंडोल- 58.36%

१३ जळगाव सिटी- 45.11%
१४ जळगाव ग्रामीण -60.77%
१९ जामनेर -57.34%
२० मुक्ताईनगर- 59.69%
१८ पाचोरा -46.10%
११ रावेर – 62.50 %

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now