जळगाव शहरातून पुन्हा राजूमामा भोळे आमदार होणार? पाहा EXIT POLL

नोव्हेंबर 21, 2024 1:26 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२४ । राज्यातील विधानसभा निवडणुकीचं मतदान एकाच टप्प्यात पूर्ण झालं. यात जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान झालं. यांनतर आता २३ नोव्हेंबरला निकाल लागणार असून त्यापूर्वी विविध माध्यमांचे एक्झिट पोल समोर आले.

rajumama jayashri

यात जळगाव शहर मतदारसंघातून भाजपचं पारडं जड होताना दिसत आहे. जळगाव शहरातून सुरेश भोळ हे संभाव्य आमदार असतील. भाजपचे सुरेश भोळे यांची लढत ठाकरे गटाचे जयश्री महाजन यांच्यासोबत होती.

जळगाव शहरात सुरेश भोळे यांनी २०१९ मध्येही निवडणुक चांगल्या मताने जिंकली होती. या मतदारसंघात ठाकरे गटाचे बंडखोल वसंत पाटील हेदेखील रिंगणात आहेत.तर मनसेकडून अनूज पाटील हेदेखील रिंगणात आहे. त्यामुळे बहुरंगी लढत होताना दिसत आहे. परंतु गेल्या १० वर्षांपासून सुरेश भोळे यांनी केलेल्या विकासाच्या कामांवर त्यांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now