जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान

नोव्हेंबर 21, 2024 9:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२४ । राज्यात काल 20 नोव्हेंबर रोजी एकूण 288 मतदारसंघात सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान पक्रिया पार पडली. यात जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान झाल्याचे समोर आले आहे. रात्री उशीरा जिल्हा प्रशासनाने मतदानाच्या टक्केवारीची अचूक माहिती जाहीर केली आहे.

loksabha election jpg webp

जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात काल सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत मतदान घेण्यात आले. बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळी त्ुारळक लोक असले तरी दुपारपासून गर्दी झाली. तर सायंकाळी बऱ्याच मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्या. परिणामी बऱ्याच केंद्रांवर रात्री उशीरापर्यंत मतदान चालले. यामुळे प्रशासनाला अचूक माहिती देता आली नाही.

या पार्श्वभूमिवर, जिल्हा प्रशासनाने रात्री उशीरा मतदानाची अचूक आकडेवारी दिली आहे. यानुसार जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान रावेर तालुक्यात ७३.८४ तर त्या खालोखाल मुक्ताईनगर ७०.७१, जामनेर ७०.५५ यांची टक्केवारी आहे. जिल्ह्यात सुरुवातीला असलेला मतदारांचा निरुत्साह नंतर उत्साहामध्ये बदलल्याचे दिसून आले.

मतदारसंघनिहाय आकडेवारी खालील प्रमाणे आहे.

चोपडा : 66.57 टक्के

रावेर : 73.84 टक्के

भुसावळ : 57.75 टक्के

जळगाव शहर : 54.95 टक्के

जळगाव ग्रामीण : 69.33 टक्के

अमळनेर : 65.61 टक्के

एरंडोल : 68.86 टक्के

चाळीसगाव : 61.67 टक्के

पाचोरा : 68 : 32 टक्के

जामनेर : 70.55 टक्के

मुक्ताईनगर : 70.71 टक्के

आता 23 नोव्हेंबरला मतमोजणी आणि निकालाचे सर्वांना वेध लागले आहेत. त्यामुळे आता कोणत्या मतदारसंघातून कोण निवडून येणार आणि कोण पराभूत होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागून असणार आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now