राज्यात पुन्हा कोसळधार! हवामान खात्याकडून आज जळगाव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी

सप्टेंबर 16, 2023 8:18 AM

जळगाव लाईव्ह न्यूज : 16 सप्टेंबर 2023 : राज्यात पावसाने पुन्हा कमबॅक केलं असून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा वर्तविण्यात आला आहे. आज जळगाव जिल्ह्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज असून या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

rain jpg webp

राज्यात गणपतीच्या आगमानाची तयारी सुरु असताना मान्सून सक्रीय झाला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हे क्षेत्र आता पूर्व मध्यप्रदेश आणि लगतच्या भागावर आहे. मध्य प्रदेशमधून कमी दाबाचा पट्टा दक्षिण कोकणपर्यंत तयार झाला असून त्यामुळे आज शनिवारी १६ सप्टेंबर रोजी जळगावसह राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच एका जिल्ह्यात रेड अलर्ट दिला आहे. यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे.

कोणत्या जिल्ह्यास रेड अन् ऑरेंज अलर्ट
राज्यात यंदा जुलै महिन्यात पावसाचा रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला होता. आता त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी दहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यात खान्देशातील नंदूरबार, जळगाव, धुळे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना विदर्भातील अकोला, नागपूर, वर्धा, तसेच मुंबईतील पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यास पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट विदर्भातील अमरावती जिल्ह्यास दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now