⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यावर तात्कळ कार्यवाही करा, अन्यथा..

जळगाव लाईव्ह न्युज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील तापी पूर्णा नदीपात्रातून दररोज हजारो ब्रास वाळू उपसा सुरु आहे. मात्र या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे पूर्णता दुर्लक्ष आहे. परंतु, यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा गौण खनिज बुडवला जात आहे. त्यामुळे यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अश्या मागणीचे निवेदन मनसेतर्फे नायब तहसीलदार जांबरे यांना देण्यात आले आहे. दरम्यान, याबाबत असलेल्या आरोपांमध्ये तथ्थ आहे का? हे जाणून घेण्यासाठी ‘जळगाव लाईव्ह’ने तहसीलदारांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

तालुक्यातील पिंप्री नांदुसह रिगाव, भोटा, धुपेश्र्वर तापी पूर्णा नदीपात्रातून दररोज हजारो ब्रास वाळू उपसा सुरु आहे. मात्र या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे पूर्णता दुर्लक्ष आहे. यामुळे सरकारचा लाखो रुपयांचा गौण खनिज बुडवला जात आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रखर झाली आहे. तहसीलदार यांना बहुतांश वेळी भ्रमणध्वनी वरून कळविले. वा वाहनांचे रस्त्यावर वाळू वाहून नेणारी ट्रॅक्टर, डंपर यांचे अचूक संकेत स्थळ व्हॉट्सॲप वर करेक्ट लोकेशन टाकले. मात्र तहसीलदार याकडे दुर्लक्ष करीत आहे. भर दिवसा वाळू वाहन बिना परवाना लहान लहान मुले बिना नंबर प्लेट ट्रॅक्टर, डंपर वाहतुकीची कोंडी रस्त्याने चालणाऱ्या प्रवाशांच्या डोळ्यात माती रेती चे कण जातात प्रवाशांचे बहुतांश वेळी तक्रारी ऐकायला येतात. मागील घटना मध्ये लहान बालक वाळू च्या ट्रॅक्टर खाली आल्यामुळे जीवित हानी झाली होती. तेव्हा पासून तत्कालीन मुक्ताईनगर येथील पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी तेरा ट्रॅक्टर धारकावर कार्यवाही केली होती. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत लाखो रुपयांचा शासन नावे पैसा जमा केला होता. तशाच पद्धतीने तहसीलदार यांनी कार्यवाही चा बळगा सुरू केला पाहिजे व नदीपात्रात अवैध वाळू उपसा उत्खनन करणाऱ्या जेसीबी व पोकलांड वर कडक कार्यवाही करावी. असे निवेदनात म्हटले आहे.

मनसेचे तालुका अध्यक्ष मधुकर भोई, मंगेश कोळी,गजानन पाटील,प्रमोद मिस्टरी,प्रमोद जावळे,शांताराम महाराज भील, गणेश जुंबळे यांच्या सह्या आहेत. दरम्यान, दोन दिवसात कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.