रस्त्याची कामे झाली नाहीत तर रास्ता-रोको करणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ फेब्रुवारी २०२३ । शिवाजीनगरातील लाकूड पेठपासून तर थेट टी. टी. साळुंखे चौक रस्ता दुरुस्तीबाबत महापालिकेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय दूध फेडरेशन रस्त्याच्या कामातही दिरंगाई होत आहे. तातडीने या रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला.

महापौरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शिवाजीनगरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पावसाळ्यात आंदोलन केले होते. त्यावेळी पावसाळ्यानंतर तातडीने या रस्त्याचे काम करण्यात येईल, असे आश्वासन पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र, पावसाळा जाऊन तीन महिने झाले, तरी या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने करण्याची गरज आहे.

जळगाव शिवाजीनगरातील रस्त्याच्या कामाबाबत विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांना निवेदन देण्यात आले. शिवसेना विभागप्रमुख विजय बांदल व शिवसैनिक शिवाजीनगर विभागप्रमुख विजय बांदल यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर विनोद तायडे, जावेद शेख, राजू सय्यद, सुनील निकम, केशव जानभरे, कैलास गायकवाड आदींच्या