जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जानेवारी २०२२ । शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अल्ताफ खान (मुळगाव-घाट रोड चाळीसगाव) यांचे चिरंजीव अजलान खान याने २६ रोजी पोलीस अधीक्षक सारखे युनिफॉर्म पोशाख घालून पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांची भेट घेऊन मला पोलीस अधीक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली.

वडील पोलीस सेवा बजावत असतांना लहानपणी वडिलांचे कर्तव्य बघून चिरंजीव अजलान खान अल्ताफ खान याने जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत यांची भेट घेऊन दोघांशी हितगुज केली. अजलान खान याची इच्छाशक्ती बघून सर्व चकित झाले व त्यास पुढील आयुष्य व वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा :
- जळगावच्या चिमुकल्याची स्केटिंगमध्ये धडाकेबाज कामगिरी; ३ पदकं जिंकत आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
- गणेशोत्सवात सर्वसामान्यांना दिलासा ! खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी सरकार उचलणार मोठं पाऊल
- सोने-चांदी खरेदीदारांसाठी गुड न्यूज! जळगावात आज दोन्ही धातूंचे दर घसरले
- जमीन कर्जासाठी आता ‘एनए’ची गरज नाही! जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना स्पष्ट आदेश
- जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!







