जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात एकीकडे गुन्हेगारी वाढताना दिसत असून त्यात चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. अशातच भडगाव तालुक्यातील कजगाव येथे घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आलीय. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कजगाव येथील गोंडगाव रोडवरील रहिवासी ओंकार रामदास चव्हाण व स्टेशन भागातील रहिवासी राजश्री नितीन देशमुख यांच्या घरावर सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकत सोने, चांदी सह रोकड रक्कम मिळुन अंदाजे दहा लाखांची चोरी करत ऐवज दरोडेखोरांनी लाबविला.
चव्हाण व देशमुख कुटूंबाची मारहाण करत, गावात दहशत निर्माण केली. दरोडेखोरांची सात ते आठ संख्या असल्याची माहिती चव्हाण व देशमुख कुटूंबानी दिली. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांसह श्वानपथक दाखल झाले आहे. गावात प्रचंड घबराट पसरली आहे.