जळगाव लाईव्ह न्यूज । बुलेट सारख्या वजनदार बाईकला टक्कर देण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने भारतात CB350C वजनदार बाईक लाँच केली आहे. ही CB350C चं हे अपडेटेड व्हर्जन असून ही बाइक थेट रॉयल एनफिल्ड 350 ला टक्कर देते.ही बाईक कंपनीच्या बिगविंग डीलरशिपवर उपलब्ध असेल आणि तिची किंमत ₹२.०१ लाख (एक्स-शोरूम) आहे.

या रेट्रो क्लासिक मोटरसायकलसाठी बुकिंग सुरू करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून देशभरातील सर्व होंडा बिगविंग डीलरशिप्सवर उपलब्ध होईल. ही मोटरसायकल क्लासिक मोटरसायकल प्रेमींना लक्षात घेऊन सादर केली गेली आहे.

या बाईकच्या इंधन टाकीवर एक स्पेशल एडिशन स्टिकर आहे, तसेच इंधन टाकी, पुढील आणि मागील फेंडर्सवरील ग्राफिक्स आहेत. रेट्रो घटकांना हायलाइट करताना, बाईकमध्ये क्रोम रियर ग्रॅब रेल आणि काळ्या किंवा तपकिरी सीटचा पर्याय देखील आहे. दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे: रेबेल रेड मेटॅलिक आणि मॅट ड्यून ब्राउन.
वैशिष्ट्ये काय आहेत?
CB350C मध्ये डिजिटल-एनालॉग इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असून, त्यास Honda स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टम (HSVCS) जोडले आहे, जे राईड करताना प्रगत माहिती सादर करते. ही रेट्रो क्लासिक मोटरसायकल असिस्ट & स्लिपर क्लचसह सुसज्ज आहे आणि यात होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HSTC) सिस्टम तसेच ड्युअल-चॅनेल ABS आहे, जे राइडरच्या सुरक्षिततेला अधिक वाढवते.
इंजिन किती शक्तिशाली आहे?
नवी CB350C स्पेशल एडिशन 348.36 cc, एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल-सिलिंडर BSVI OBD2B E20 अनुरूप PGM-FI इंजिनवर चालवली जाते. ही मोटर 5,500 RPM वर 15.5 kW शक्ती आणि 3,000 RPM वर 29.5 Nm पीक टॉर्क निर्माण करते, जी 5-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडलेली आहे.
किंमत काय आहे?
होंडाने भारतीय बाजारात मोटरसायकलची विशेष आवृत्ती ₹२.०१ लाख एक्स-शोरूम किमतीत लाँच केली. या मोटरसायकलची बुकिंग देखील सुरू झाली आहे ती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर (www.honda2wheelersindia.com) किंवा जवळच्या होंडा बिगविंग डीलरशिपवर जाऊन बुक केली जाऊ शकते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात त्याची डिलिव्हरी सुरू होईल.












