अरे बापरे : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेला चोरीला

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ फेब्रुवारी २०२३ । छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आला आहे. चोरट्यांनी अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग चोरून नेला आहे. एका उद्यानामध्ये हा पुतळा उभारण्यात आला होता.

छत्रपतींच्या पुतळ्याची चोरी कधी झाली? हे अजून समजले नाहीये. सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या मदतीने सदर पुतळ्याची विटंबना करून तो चोरणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

अधिक माहिती अशी कि, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अमेरिकेतला एकमेव पुतळा चोरट्यांनी चोरला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सॅन होजे शहरामध्ये हि घटना घडली आहे. अश्वारुढ पुतळ्याचा वरचा भाग कापून चोरट्यांनी तो चोरून नेला.