आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची त्यांची हिम्मत झाली नाही – आदित्य ठाकरे
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२२ । शिवसेनेतून गद्दारी करत भाजपला मिळालेल्या त्या बंडखोर आमदारांची आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिम्मत झाली नाही. अशी टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.
राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी वेग आला. या निवडीत भाजपने आपला उमेदवार जाहीर केला. भाजपचे राहुल नार्वेकरयांना उमेदवारी दिली तर शिवसेनेने राजन साळवी यांना उमेदवारी दिली. आधी आवाजी मतदान झाले त्यानंतर मतदान हे वैयक्तिक मतदानाने झाले.महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत झाली यात राहुल नार्वेकर विजयी झाले. त्यांना १६४ मत मिळाली.
यानंतर अभिनंदन करण्यासाठी सर्व बडे नेते बोलत होतो. यावेळी शिवसेनेतून गद्दारी करत भाजपला मिळालेल्या त्या बंडखोर आमदारांची आमच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची बोलण्याची हिम्मत झाली नाही असे आदित्य ठाकरे बोलले. यामुळे हे आमदार मॉरल टेस्ट हरले असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.