HDFC बँकेचा ग्राहकांना धक्का ! आता ‘इतका’ मिनिमम बॅलेंस ठेवावा लागणार? अन्यथा..

ऑगस्ट 13, 2025 9:19 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑगस्ट २०२५ । आयसीआयसीआय बँकेनंतर आता HDFC बँकेने ग्राहकांना धक्का दिला आहे. आयसीआयसीआय बँकेप्रमाणे एचडीएफसी बँकेनेदेखील किमान बॅलेंस वाढवण्याची घोषणा केली आहे. आता १०,००० रुपयांऐवजी तुम्हाला २५००० रुपये खात्यात ठेवणे अनिवार्य आहे. अन्यथा, बँक शुल्क कापू शकते. एचडीएफसी बँकेने १ ऑगस्ट २०२५ पासून हा नियम लागू केला आहे. आणि हे नियम १ ऑगस्टनंतर जे ग्राहक अकाउंट ओपन करतील त्यांना लागू होणार आहेत.

HDFC bank

आता, १ ऑगस्ट २०२५ नंतर नवीन बचत खातेधारकांना किमान २५,००० रुपये ठेवावे लागतील. जर ते यापेक्षा कमी असेल तर बचत खात्यातून शुल्क वजा केले जाईल. म्हणजेच, बचत खात्यात नेहमीच किमान २५,००० रुपये ठेवावे लागतील. हे नियम मेट्रो, अर्बन शहरांमध्ये लागू आहेत. सध्या एचडीएफसी बँकेच्या बचत खात्यात किमान १०,००० रुपये असणे आवश्यक आहे. त्यानंतर आता ही लिमिट जवळपास अडीचपट वाढवण्यात आली आहे.

ICICI बँकेनेदेखील वाढवली होती लिमिट

आयसीआयसीआय बँकेने तर किमान बॅलेंस ठेवण्याची रक्कम ५०,००० रुपये केली आहे. याआधी ही रक्कम १०,००० रुपये होती. जर तुमच्या अकाउंटमध्ये ५०,००० रुपये नसतील तर तुम्हाला दंड भरावा लागणार नाही. एकीकडे सरकारी बँका किमान बॅलेंस ठेवण्याचा नियम रद्द करत आहेत तर दुसरीकडे प्रायव्हेट बँका आपला किमान बॅलेंस वाढवत आहेत. आयसीआयसीआय बँकेने तर मिनिमम बॅलेंसची लिमिट ५ पटीने वाढवली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now