शिवापूरच्या विकास सोसायटीच्या चेरमनपदी हरिष घाडगे

जुलै 10, 2022 3:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२२ । शिवापूर येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेरमनपदी हरिष रघुनाथ घाडगे व व्हाइसचेरमनपदी अशोक उत्तम पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली .

chermenpadi jpg webp

शिवापूर सोसायटीच्या १३ जागेंची बिनविरोध निवड करण्यात आली. विकास सोसायटीच्या सर्व शेतकरी सभासद व ग्रामस्थांनी हरिभाऊ घाडगे व त्याच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवत ही निवडणूक बिनविरोध करण्याची अखंड परंपरा याही वर्षी चालू ठेवली . खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडली.

चेरमनपदासाठी हरिष रघुनाथ घाडगे व व्हाइसचेरमन अशोक उत्तम पाटील यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी एस. आर गोस्वामी व साह्य निवडणूक अधिकारी सचिव प्रधान जगन्नाथ राठोड यांनी जाहीर केले. संचालक मंडळ म्हणून घाडगे पंढरीनाथ चिंधा, जाधव धर्मा मागु, देशमुख अशोक, घाडगे ज्ञानेश्वर, गोपाळ उत्तम, पाटील अशोक उत्तम, कुऱ्हाडे अंजनाबाई, घाडगे जण्याबाई, भिल बबन, घाडगे हरिष, गोपाळ नाण्याबाई, राठोड सुबीबाई, जाधव लक्षण टीला या १३ प्रतिनिधीची बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध निवड झाल्याबद्दल शिवापूर ग्रामस्थांचे यावेळी आभार मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now