⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

पाल येथील जि.प.उर्दू शाळेचे मुख्याध्यापक हनीफ खान यांचे निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२२ । रावेर तालुक्यातील पाल येथील जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले मुख्याध्यापक हनिफ खान गुलाब खान वय ५६ यांचे नाशिक येथे उपचारा दरम्यान आज निधन झाले.

सविस्तर वृत्त असे की, हनीफ खान गुलाब खान मुख्यध्यापक हे नेहमी प्रमाणे शुक्रवारी पाल येथे शाळेत आले होते. शाळेतून परत जाताना पाल ते रावेर प्रवास दरम्यान त्यांची परिस्तिथी खालावली. त्यांना उपचारासाठी रावेर येथील श्रीपाद हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती लक्षात घेत येथील डॉक्टरानी पुढील उपचरासाठी त्यांना जळगाव पाठवले. येथून ही त्यांना नाशिक येथिल रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सकाळी चार वाजता त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

त्यांनी रसलपुर,कर्जोद, मोठा वाघोदा आणि सध्या ते पाल येथे जिल्हा परिषद उर्दू शाळेत मुख्यध्यापक म्हणून मागील चार वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांच्या निधनाने कर्जोद,रसलपूर, वाघोदा, पाल येथील पालक विध्यार्थी तसेच तालुक्यातील शिक्षकवृंद, यावल तालुका प्रभारी शिक्षणाधिकारी नइमोद्दीन शेख, केंद्र प्रमुख रईस शेख अलाउद्दीन, शकील सईद, यांनी दुःख व्यक्त केले.