⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

भुसावळात ऑक्सीजनचा पुरवठा करणार्‍या ठेकेदाराला तत्काळ थकीत पेमेंट अदा करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२१ । भुसावळ शहराच्या ग्रामीण रुग्ग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून ऑक्सीजन सिलिंडरचा पुरवठा करणार्‍या ठेकेदाराला अद्यापही शासनाकडून थकीत पेमेंट मिळत नसल्याने त्या संदर्भात होणारी गैरसोय लक्षात घेता शिवसेना पदाधिकार्‍यांनी बुधवारी जळगावच्या अजिंठा रेस्ट हाऊसला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेवून निवेदन सादर करीत तातडीने समस्या सोडवण्याची विनंती केली. 

पदाधिकार्‍यांची विनंती लक्षात घेता पालकमंत्र्यांनी तातडीने सिव्हील सर्जन यांच्याशी संपर्क साधून भुसावळा ऑक्सीजनचा पुरवठा करणार्‍या ठेकेदाराचे तातडीने थकीत बिल अदा करण्याच्या सूचना केल्या. याप्रसंगी शिवसेनेचे अ‍ॅड.निर्मल दायमा, शहर प्रमुख बबलू बर्‍हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, माजी नगरसेवक नरेंद्र लोखंडे आदींची उपस्थिती होती.