भुसावळ मार्गे पनवेल ते सुभेदारगंज दरम्यान विशेष गाडी धावणार, वेळापत्रक अन् थांबे तपासून घ्या..

मे 21, 2026 11:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । उन्हाळी सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांमध्ये वाढलेली गर्दी आणि प्रवाशांची साततीची मागणी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते सुभेदारगंज दरम्यान अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष या गाडीला भुसावळला थांबा मंजूर करण्यात आला असून यामुळे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

train

गाडी क्रमांक ०४१०४ पनवेल–सुभेदारगंज साप्ताहिक विशेष गाडी आज गुरुवारी २१ मे रोजी आणि २८ मे रोजी पनवेल स्थानकावरून दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता सुभेदारगंज येथे पोहोचणार आहे. या मार्गावर एकूण दोन विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तर परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०४१०३ सुभेदारगंज–पनवेल साप्ताहिक विशेष गाडी बुधवारी २७ मे रोजी सुभेदारगंज येथून दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून २० मिनिटांनी पनवेल येथे पोहोचेल.

या विशेष स्थानकांवर असेल थांबा?

कल्याण, नाशिक, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना आणि माणिकपूर जंक्शन या स्थानकांचा समावेश आहे. त्यामुळे उत्तर भारताकडे जाणाऱ्या तसेच महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना या सेवेमुळे मोठा फायदा होणार आहे.

गाड्यांच्या संरचनेत प्रवाशांच्या विविध गरजा लक्षात घेऊन वातानुकूलित तसेच सामान्य श्रेणीतील डब्यांचा समावेश करण्यात आला आहे. या विशेष गाडीत १ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ६ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, ८ शयनयान श्रेणी डबे आणि ५ सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील. तसेच १ सामानासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅनचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना अधिक आरामदायी सुविधा उपलब्ध होणार आहेत.

तिकीट आरक्षण प्रक्रिया सुरू
गाडी क्रमांक ०४१०४ साठी विशेष शुल्कासह आरक्षण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर (PRS Counter) तसेच आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत संकेतस्थळावर तिकीट बुक करता येईल. याशिवाय, डिजिटल सुविधेचा वापर करून प्रवाशांना ‘रेलवन ॲप’ (RailOne App) द्वारेही मोबाईलवर सहज तिकीट बुक करता येणार आहे. सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now