सोने - चांदीचा भाव

जळगाव सराफा बाजारात दरांचा ‘भूकंप’! सोन्या-चांदी दरात तब्बल ‘इतक्या’ हजारांची वाढ?

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२६ । सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत असतानाच, आज जळगावचा सराफा बाजार उघडताच दरांचा प्रचंड भडका उडाला. ऐन लग्नसराईत झालेल्या या वाढीने ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या जागतिक तणावाचा थेट फटका सराफा बाजाराला बसला आहे. आज जळगाव सराफा बाजारात २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात तब्बल ३ हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोन्याचा दर १ लाख ५५ हजार रुपयांवर पोहोचला आहे. तर १० तोळे सोन्याचा दर १५ लाख ५० हजार रुपयांवर गेला आहे.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली. १ किलो चांदीच्या दरात ३ हजार रुपयांची वाढ झाली असून चांदीचा भाव २ लाख ६६ हजार रुपयांवर पोहोचला आहे. दरवाढीमुळे ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत असून बाजारात ग्राहकांची गर्दी कमी झाली आहे.

का वाढले दर?

अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा युद्धजन्य तणाव निर्माण झाल्यामुळे जागतिक शेअर बाजारात घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरातील गुंतवणूकदार सोन्याकडे वळल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली आणि परिणामी स्थानिक बाजारात दरांचा भडका उडाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button