यावल तालुक्यात ग्रामपंचायत आरक्षणाचा बिगुल! ४७ ग्रामपंचायतींचा आरक्षण कार्यक्रम जाहीर

मे 29, 2026 3:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बहुप्रतीक्षित आरक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. यावल तालुक्यातील एकूण ४७ ग्रामपंचायतींसाठी येत्या १२ जून रोजी विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या घोषणेमुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ऐन उन्हाळ्यात चांगलेच तापण्यास सुरुवात झाली आहे.

election

तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार बी. एम. पवार, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे व सुयोग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित ग्रामपंचायतींसाठी अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत.प्रशासनाच्या नियोजनानुसार १२ जून रोजी ग्रामपंचायतींमध्ये विशेष सभा घेऊन वॉर्डनिहाय प्रारूप आरक्षण काढण्यात येईल. त्यानंतर १९ जून रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्ध केले जाणार असून, त्यावर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

प्राप्त हरकतींचा निपटारा करून १० जुलै रोजी अंतिम वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. सरपंचपदाच्या आरक्षणाची घोषणा या आधीच करण्यात आली आहे. आता वॉर्डनिहाय आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येणार असून, निवडणुकीपूर्वी गावागावात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आरक्षण जाहीर होताच अनेक इच्छुकांचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now