जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा येथे आज बुधवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी विविध विकासकामे तसेच योजनांवर दोन तीन वर्षात करण्यात आलेल्या खर्चाविषयी तपशील मागितला. दरम्यान, ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच तायडे व सचिव ग्रामसेवक भुषण इंगळे यांनी येत्या दोन-तीन दिवसात सदर मागणीचा तपशील सादर करणार असल्याचे सांगितले.

ग्रामसभेत १४’१५वित्त्त आयोगाचा खर्च, दलीत वस्ती सुधारणा खर्च, मनरेगा अंतर्गत झालेला खर्च, घन कचरा व्यवस्थापन खर्च, ग्रामनिधी १५%इतर मागासवर्गीय साठी केलेला खर्च, पेय जल योजना अंतर्गत खर्च, रूर्बल योजना अंतर्गत झालेला खर्च, अपंग, विधवा यांना ५% यांच्या साठी केलेला खर्च, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय व महिला तीन सीट, चार सीट वर झालेला खर्च, रमाई घरकुल,शबरी,पंतप्रधान आवाज घरकुल ब , ड यादी मंजूर घरकुल नावे सहित, आरोग्य स्वच्छता लोक वस्तीसाठी केलेला खर्च, दिवे व पथदिवे इलेक्ट्रिक खांब वर केलेला खर्च, कुशल व अर्ध कुशल कर्मचारी यांच्यावर केलेला खर्च, दैनंदिन घरपट्टी वसुली, पावसाळ्यातील पसरणारे आजारावर नियंत्रणात आनण्या साठी केलेले उपाय योजना, अनामत रक्कम मधून केलेले काम तसेच विविध विकासकामे व योजनांवर दोन तीन वर्षात करण्यात आलेल्या खर्चाविषयी तपशील मागितला असुन येत्या दोन तीन दिवसांत मिळणार असल्याचे उत्तर सरपंच व ग्रामसेवक यांनी सांगितले.

यावेळी उत्तम जुंबळे व संदीप पाटील यांनी योजनांचा पाढा वाचला. सरपंच पुंडलिक तायडे, उप सरपंच कृष्णा पाटील,सदस्य भागवत पाटील, लक्ष्मण वाघ,योगेश पाटील,महेंद्र सिरसोदे,रतीराम सिरसोदे,ईश्वर पाटील, व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.












