जळगावकरांसाठी सुवार्ण संधी : केवळ २० रुपयात होणार आरोग्य तपासणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२३ । जळगाव शहरातील नागरिकांसाठी ‘सेवार्थ दवाखाना’ योजना राबवण्यात येत आहे. आनंदाश्रम सेवा संस्था तर्फे हनुमान मंदीर, गणेश कॉलनी येथे अगदी मुख्य रस्त्यावर हि योजना राबवण्यात येत आहे.

नाममात्र 20 रु. देणगी मुल्य घेवून गरजूंना हि सेवा पुरविण्यात येत आहे. आनंदाश्रम सेवा संस्था तर्फे संस्थेचे सदस्य डॉ. संजय सोनवणे [सेवानीवृत्त आरोग्य अधिकारी ] व डॉ विजया तळेले हे (रविवार वगळता) सकाळी 10 ते 1 हया वेळेत सेवा देत आहेत.