ग्राहकांना झटका : एकाचा दिवसात चांदी 1200 रुपयांनी महागली, सोन्यातही वाढ

नोव्हेंबर 5, 2023 10:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२३ । गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीचे (Gold Silver Price) दर सात महिन्याच्या नीच्चांकीवर पोहोचले होते. मात्र ७ ऑक्टोबर पासून सोन्यासह चांदीच्या किमतीने पुन्हा मोठी उसळी घेतली आहे. यातच आता दिवाळी तोंडावर आली असून बाजारपेठा सजल्या आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक आठवणीत रहावा यासाठी दागदागिने खरेदीकडे ओढा वाढला आहे. पण याच दरम्यान सोन्यासह चांदीचे भरारी घेतल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. Gold Silver Rate Today

gold silver jpg webp

या महिन्यात सोने-चांदीत चढउतार दिसून येत आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत काल शनिवारी चांदीच्या भावात एकाच दिवसात १,२०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी ७३ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. तसेच सोन्याच्याही भावात १०० रुपयांची वाढ होऊन ते ६१ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सतत चढ-उतार सुरू आहे.२ नोव्हेंबर रोजी ९०० रुपयांची वाढ होऊन चांदी ७२ हजार ५०० रुपयांवर पोहोचली, मात्र ३ रोजी ७०० रुपयांची घसरण होऊन ती ७१ हजार ८०० रुपयांवर आली. त्यानंतर शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी त्यात एकाच दिवसात थेट १ हजार २०० रुपयांची वाढ झाली व चांदी ७३ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. दुसरीकडे सोन्याच्या भावात तीन दिवसांपासून दररोज १०० रुपयांची वाढ होत आहे. त्यामुळे शनिवारी सोने ६१ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now