सोने 400 रुपयाने तर चांदी 500 रुपयांनी महागली ; जळगावात हा आहे आजचा भाव..

जानेवारी 31, 2024 10:46 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | 31 जानेवारी 2024 | उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र त्यापूर्वी सोन्यासह चांदीच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसात सोन्याच्या दरात प्रति तोळा ४०० रुपयापर्यंतची वाढ दिसून आली. तर चांदी ५०० रुपयांनी वाधरली आहे. दरम्यान, अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी सोने-चांदीच्या किंमती वधारल्याने बजेटनंतर मौल्यवान धातूत उसळी येते की, त्यात घसरण होते हे या आठवड्यात समोर येईल. Gold Silver Rate 31 January 2024

gold silver 1 jpg webp

यापूर्वी गेल्या आठवड्यात जळगाव सुवर्णनगरीत सोने दरात प्रति तोळा २०० रुपयांची तर चांदीच्या दरात ५०० रुपयाची वाढ झाली. तरीही डिसेंबर महिन्यापेक्षा या महिन्यात सोने-चांदीत स्वस्ताई आहे. या महिन्यात सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला असून १ जानेवारी पासून आतापर्यंत सोने ५०० ते ६०० रुपयांनी तर चांदी १४०० ते १५०० रुपयांनी स्वस्त आहे. १ जानेवारीला सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव विनाजीएसटी ६३,८०० रुपये इतका होता. तर चांदीचा दर विनाजीएस्ट ७४,५०० रुपये इतका होता.

सध्या बजेटपूर्वी दर वाढत असल्याने यांनतर सोने आणि चांदीच्या किमती कुठवर जाणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, मागील दोन दिवसात जळगावात सोन्याचा दर ४०० रुपयांनी तर चांदी ५०० रुपयांनी वाढली आहे. सोमवारी (२९ जानेवारी) सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ६२,९०० रुपये तर चांदीचा दर ७२,५०० विनाजीएसटी इतका होता. त्यांनतर मंगळवारी ( ३० जानेवारी) ला सोने १०० रुपयांनी वाढून ६१,००० तर चांदी ५०० रुपयांनी वाढून ७३००० रुपये प्रति किलोवर आली.

जळगावातील सोने-चांदीचा दर:
सध्या जळगावात २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ५७,७५० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. त्याचप्रमाणे २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ६३००० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर चांदीचा दर विनाजीएसटी ७३,००० रुपये प्रति किलो इतका आहे.
वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now