सणासुदीचे दिवस येताच सोने-चांदी महागली ; आजचे नवीन दर काय? पहा..

ऑगस्ट 31, 2023 11:28 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२३ । सणासुदीचे दिवस येताच सोने-चांदीच्या (Gold Silver Rate) दरात कमालीची वाढ झाली आहे. जागतिक बाजारात सोने गेल्या चार आठवड्यातील उच्चांकावर पोहचले आहे. अजून त्याला जुने रेकॉर्ड गाठायला अवकाश आहे. पण या दोन दिवसांत सोन्याने 500 रुपयांची तर चांदीने 700 रुपयांची घौडदौड केली. तुम्हीही आज सोने किंवा चांदी खरेदीला जात असाल तर त्यापूर्वी जाणून घ्या आजचे नवीन दर काय आहेत..

gold silver 1 jpg webp

आजचा दर काय?
गुडरिटर्न्सनुसार ऑगस्टच्या अखेरच्या दिवसात सोन्याने आक्रमक धोरण घेतले असून सलग दुसऱ्या दिवशी दरात वाढ नोंदवली गेली आहे. सराफा बाजारात सोन्याच्या दरात १५० रुपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोने ५५ हजार १५० रुपयांवर पोहोचले असताना २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याने ६० हजार १५० रुपयांवर झेप घेतली आहे. तसेच प्रति किलो चांदीसाठी ग्राहकांना ७७ हजार रुपये मोजावे लागतील.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी ५४,७०० रुपयावर गेला आहे. तर दुसरीकडे २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ५९,७०० रुपायांवर आहे. त्याचप्रमाणे एक किलो चांदीचा दर विनाजीएसटी ७५,३०० रुपयांवर गेला आहे.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now