⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

Gold Silver Today: आज सोने-चांदीचा दर काय? 10 ग्रॅमसाठी ‘इतके’ पैसे मोजावे लागताय..

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मे २०२३ । जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा खरेदीसाठी बाजारात जाण्याचा विचार करत असाल, तर जाण्यापूर्वी, एकदा तुम्हाला येथील सोन्या-चांदीचे नवीनतम दर जाणून घ्या.

जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याचा दर कालच्या किमतीत विकला जात आहे. म्हणजेच सोन्याच्या किमतीत बदल झालेला नाहीय. तर दुसरीकडे चांदीचा दर देखील स्थिर आहे. सकाळच्या सत्रात दोन्ही धातूंचे दर स्थिर दिसून आले. Gold Silver Rate Today

जळगावात सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 55,350 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,400 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. गेल्या सोमवारी (22 मे) 24 कॅरेट सोन्याचा दर 61,600 रुपये इतका होता. गेल्या आठवड्याभरात 1200 रुपयाची घसरण झालेली दिसून येत आहे.

दुसरीकडे सध्या एक किलो चांदीचा दर 72000 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. गेल्या सोमवारी (22 मे) चांदीचा दर 73,800 रुपयानजीक होता. म्हणजेच गेल्या आठवड्याभरात 1800 रुपयाची घसरण झालेली दिसून येत आहे.

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर?
आज आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याचा किंचित 17 रुपयांनी वाढला आहे. यामुळे सोन्याचा दर 59,370 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. मात्र दुसरीकडे चांदीच्या किमतीत किंचित घसरण झाली असून चांदीचा दर 31 रुपयांनी घसरून 71,198 रुपयावर व्यवहार करत आहे.

सोने 65,000 तर चांदी 80000 रुपयावर जाणार?
तुम्हीही सोन्या-चांदीचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर बाजारभावानुसार हा काळ उत्तम आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्यात चढ-उतार सुरू आहेत. यंदाच्या दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच चांदीचा भावही 80 हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.