सोने स्वस्त, चांदी पुन्हा चमकली ; जाणून घ्या आजचा 10 ग्रॅम सोन्याचा दर

मे 27, 2023 10:57 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२३ । कमकुवत जागतिक कल दरम्यान, भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत बदल झाला आहे. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतीत किंचित घसरण झाली मात्र चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून येतेय. Gold Silver Rate Today

gold silver 2 jpg webp

मल्टी-कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर?
शुक्रवारी आठवड्याच्या शेवटच्या सोन्याचा भाव किंचित 88 रुपयांनी घसरून 59,372 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. मात्र दुसरीकडे चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून येतेय. चांदीचा दर तब्बल 1,049 रुपयांनी वाढला. त्यामुळे एक किलो चांदीचा दर 71,291 रुपयांवर गेला.

जळगाव सुवर्णनगरीतील आजचा दर?
जळगाव सुवर्णनगरीत 22 कॅरेट सोन्याचा 55,500 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात हा दर 56,600 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका होता. म्हणजेच आतापर्यंत 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत तब्बल 1000 ते 1100 रुपयाची घसरण दिसून येतेय.

तर 24 कॅरेट सोने 60,500 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 60,700 रुपये (विनाजीएसटी) इतका होता. त्यात 100 रुपयाची घसरण झालेली दिसून येत आहे. चांदीचा एक किलोचा दर 71,250 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात चांदीचा दर 71000 हजारावर होता.

सोने 65,000 तर चांदी 80000 रुपयावर जाणार?
तुम्हीही सोन्या-चांदीचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर बाजारभावानुसार हा काळ उत्तम आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्यात चढ-उतार सुरू आहेत. यंदाच्या दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच चांदीचा भावही 80 हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now