डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात

ऑगस्ट 7, 2026 5:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | भारतीय हातमाग परंपरेचे जतन, संवर्धन आणि विद्यार्थिनींमध्ये स्वदेशी उत्पादनांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात राष्ट्रीय हातमाग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Handloom Day

राष्ट्रीय हातमाग दिन हा भारताच्या समृद्ध वस्त्रोद्योग आणि विणकरांच्या योगदानाचा गौरव करणारा दिवस म्हणून ७ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नयना झोपे तसेच डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्सच्या प्राचार्य प्रा. डॉ. कविता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या बांधणीच्या साड्या, हातमागावर तयार केलेल्या साड्या, आकर्षक रांगोळ्या तसेच ज्वेलरी यांचे सुंदर प्रदर्शन भरविण्यात आले होते.प्रदर्शनाला भेट देणार्‍या मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या कलाकुसरीचे आणि सर्जनशीलतेचे कौतुक केले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध वस्तूंमधून भारतीय हातमाग परंपरेचे सौंदर्य आणि कौशल्य प्रभावीपणे अधोरेखित झाले. उपस्थितांनी विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत अशा उपक्रमांमुळे पारंपरिक कला आणि स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळत असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी प्राचार्य प्रा. डॉ. कविता देशमुख यांनी राष्ट्रीय हातमाग दिनाचे महत्त्व, भारतीय विणकरांचे योगदान तसेच हातमाग उद्योगासमोरील संधी आणि आव्हाने याविषयी मार्गदर्शन केले. स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवून स्थानिक कारागिरांना पाठबळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमास विधी महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. कीर्ती पाटील, प्रा. डॉ. ललिता सपकाळे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्रीमती मीनल राणे, ग्रंथपाल सौ. कविता भोरटेकर, प्रा. कोमल भालेराव तसेच एन.एस.एस. ऑफिसर प्रा. जयश्री कुलकर्णी यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे राष्ट्रीय हातमाग दिनाचा हा उपक्रम संस्मरणीय ठरला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now