⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

गेल्या चार दिवसात सोने 1300 रुपयांनी घसरले ; पहा आता 10 ग्रॅमचा दर

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२३ । या महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी चढ-उतार दिसून आली. मागील काही दिवसापासून सोन्याचं किमतीत सातत्याने घसरण झाली. जळगाव सुवर्ण नगरीत बुधवारी (24मे) सकाळच्या सोन्याचा प्रति तोळ्याचा 61 हजारांवर होता. तो आता 60 हजाराच्या घरात आला आहे. Gold Silver Rate Today

गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी गुरुवारी सोने आणि चांदींच्या दरात हजार रुपयांची घसरण झाली होती. तीन दिवसांनंतर सोन्याच्या दरातील घसरण सुरु आहे. सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर 55,350 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,400 रुपये (विनाजीएसटी) प्रति तोळा इतका आहे.

बुधवार सोन्याचे प्रती तोळ्याचे दर 61,700 रुपये (विनाजीएसटी) प्रति 10 ग्रॅम इतका होता त्यात आतापर्यंत तब्बल 1300 रुपयांची घसरण झालेली दिसून येतेय. परंतु चांदीचे दर मात्र, पुन्हा पूर्वपदावर गेले आहे.

चांदीचे बुधवारी प्रती किलोचे दर 72,150 होते. गुरुपुष्यामृताच्या दिवशी ते 1150 ने कमी होत चांदी 71,000 रुपये किलो झाली होती. मात्र शुक्रवार आणि शनिवार पुन्हा वाढून चांदीचा दर आता 72000 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे.

सोने 65,000 तर चांदी 80000 रुपयावर जाणार?
तुम्हीही सोन्या-चांदीचे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर बाजारभावानुसार हा काळ उत्तम आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्यात चढ-उतार सुरू आहेत. यंदाच्या दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच चांदीचा भावही 80 हजार रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.