वर्षभरात सोन्याच्या दराने तिसऱ्यांदा ओलांडला ‘हा’ टप्पा ; आजचा प्रति तोळ्याचा भाव पहा..

नोव्हेंबर 27, 2023 10:41 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२३ । तुळसी विवाहनंतर आजपासून देशभरात लग्नसराईला सुरुवात झाली आहे. याकाळात सोने आणि चांदीला (Gold Silver Rate) मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र याच दरम्यान दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली आहे. यंदा वर्षात तिसऱ्यांदा सोन्याने प्रतितोळे ६२ हजारांवर मजल मारली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोने ६२ हजार १०० वर असून आगामी काळात सोने ६४ हजारांवर पोहोचण्याचा अंदाज तज्ज्ञांचा आहे.

gold silver jpg webp

मे महिन्यात ५ तारखेला प्रथमच सोने ६२ हजार १०० रुपये प्रति तोळा या उच्चांकी दरावर पोहोचले होते. त्यानंतर सोन्याचे भाव ६१ व ६० हजारांवर स्थिरावले होते. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याचा दर घसरून ५८ हजाराच्या खाली आला होता. मात्र त्यानंतर इस्त्राईल- हमास यांच्यातील युद्धामुळे सोन्याने पुन्हा उसळी घेतली. २८ ऑक्टोबरला सोने अगोदरचा उच्चांक मोडीत काढत १०० रुपयांनी मागे टाकत ६२ हजार २०० वर गेले होते.

नोव्हेंबरमध्ये गेल्या आठवड्यात पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी ६१ हजार ५०० असलेल्या सोन्याच्या प्रतितोळ्याच्या दरात ३०० वाढ झाली. बुधवारी आणखी २०० रुपयांनी दर वाढून ६२ हजारांवर दर पोहोचले. शनिवारी ६२ हजारांचा टप्पा पार करून ते ६२,१०० वर पोहोचले. रविवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ६२ हजार १०० रुपये होते. दरम्यान, सोन्याच्या प्रति तोळ्याचा दर यंदा वर्षभरात तीन वेळा ६२ हजारांच्या पार गेला. तो आगामी काळात ६४ हजारांपर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज तज्ज्ञांचा आहे.

दुसरीकडे चांदीच्या बद्दल बोलायचं झाल्यास चांदीने देखील मोठी उसळी घेतली आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला ६८ हजारावर आलेला चांदीचा दर आता पुन्हा ७५ हजारांवर गेला आहे. सध्या सराफ बाजरात चांदीचा दर ७५,१०० रुपयावर विकला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now