Gold-Silver Rate : सोने-चांदी दरातील घसरण सुरूच ; वाचा आजचे दर

एप्रिल 25, 2022 10:15 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । मागील काही सत्रातपासून सुरु असलेली सोने आणि चांदीच्या दरातील घसरण आजही कायम आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज जळगाव सुवर्ण नगरीत सोने १५० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात ५९० रुपयाची घसरण झाली आहे.

gold silver

आजचा सोने- चांदीचा भाव
सोमवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५३,४९० रुपये इतका आहे. तर चांदी ६८,११० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.
सोन्या चांदीचे भाव हे दिवसातून दोनदा बदलतात. सकाळी मार्केट सुरू होताच भाव जाहीर होतात. तर दुसऱ्यांदा सायंकाळी सहाच्या दरम्यान पुन्हा एकदा भाव जाहीर केले जातात.

गेल्या आठवड्यात जळगाव सराफ बाजारात सोने ४ वेळा स्वस्त झाले आहे. तर एक वेळा महागले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही ४ वेळा घसरण तर एक वेळा वाढ झाली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात जवळपास ७०० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी २४०० रुपयापर्यंतची घसरण झाली आहे.

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धापूर्वी सराफ बाजारात सोन्याचा भाव ४८ ते ४९ हजाराच्या घरात होते मात्र युद्धानंतर सोने दरात मोठी वाढ दिसून आली. रशिया-युक्रेनमधील युद्धादरम्यान सोने तब्बल ४ ते ५ हजार रुपयांनी महागले होते गेल्या महिन्यातील ९ तारखेला सोन्याच्या दराने ५५ हजाराचा टप्पा पार केला होता. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सोने (ऑगस्ट २०२०) ५६,२०० प्रति तोळ्यावर गेले होते.

गेल्या आठवड्यातील दर
जळगावमध्ये १८ एप्रिल रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ५४,२३० रुपये होते. १९ एप्रिल रोजी ५४,५२०, २० एप्रिल रोजी ५३,९९० तर, २१ एप्रिल ५३,८६०, २२ एप्रिल ५३,६४० रुपये प्रति तोळा असा होता. तर दुसरीकडे १८ एप्रिल रोजी चांदी दर ७०,६५० प्रति किलो होती. १९ एप्रिल ७१,६२०, २० एप्रिल ७०,३८० तर २१ एप्रिल ला ७०,०१०, २२ एप्रिल ६८,७०० रुपये प्रति किलो इतका होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now